खाकी ड्रेस घालून एका अधिकाऱ्यांनी शास्त्रींच्या पुढं घातलं लोटांगण पोलिस आयुक्त कारवाई करणार का? : पुण्यात धीरेंद्र शास्त्रींच्या क्रार्यक्रम स्थळी भाविकांना महाराजांच्या स्वयंसेवकांकडून मारहाण करुन दिला प्रसाद

पुणे दिनांक २१ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात आज मंगळवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी बागेश्र्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींच्या क्रार्यक्रमाचे संपूर्ण पुणे शहरात जाहिरात करुन कार्यक्रमांचे आयोजन आयोजकांने केले.होते त्यामुळे सहाजिकच या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.पण कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या भाविकांना महाराजांच्या स्वयंसेवकांनी चांगलाच मारहाण करून प्रसाद दिला आहे.
दरम्यान याप्रकरणी कार्यक्रमाला कधी पासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विरोध करण्यात आला होता.व तसेच हे महाराज अंधश्रद्धा पसरवण्यांचे काम करत असल्याने बागेश्र्वर धामचे धीरेंद्र शास्त्रीं यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसने केली आहे.दरम्यान या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वंयंसेवका कडून भाविकांना मारहाण करून प्रसाद देण्यात आला.या बाबतचा व्हिडिओ समोर आला आहे.पण यावेळी बंदोबस्ता वर उपस्थित असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.तर बंदोबस्तावर उपस्थित असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने ड्रेसवरच धीरेंद्र शास्त्रीं यांच्यासमोर लोंटागन घातले होते.याचा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर अंनिस संघटनेने या पोलिस अधिकारी यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.