Accident Death : नवरात्र उत्सवासाठी तुळजाभवानी मातेची ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाची झडप दोघे ठार

नवरात्र उत्सव निमित्त तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेची ज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोघा भावीकांवर काल रात्री काळाने झडप घातली असून त्यांच्या मोटर सायकल ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघेजण नवरात्र महोत्सव मंडळाचे कार्यकर्ते होते.
अपघातामध्ये ठार झालेल्या दोघा जणांची नावे. महेश भास्करराव भोसले. ( वय ३१. रा.सांगवी पाटण ) अमोल सुरेशराव खिलारे. ( वय.३८. रा.सांगवी पाटण ) अशी आहेत. सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका तील सांगवी पाटण येथील कार्यकर्ते सालाबाद प्रमाणे नवरात्र उत्सव निमित्त देवीची स्थापना करतात. व तुळजापूरावरून ज्योत आणण्याची त्यांच्या गावाची परंपरा आहे. त्यासाठी शनिवारी अकरा वाजण्याच्या सुमारास मंडळाचे 50 कार्यकर्तेही टेम्पो पिकप अशा वाहनातून चालले होते. तर महेश व अमोल हे मोटरसायकल वरून जात होते.
त्याचवेळी रात्रीच्या नऊ वाजण्याच्या सुमारास येरमाळा जवळ भरघाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटर सायकल ला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अपघातील महेश हा आरोग्य सेवक होता तर अमोल हा उपसरपंच होता. त्यांच्या अपघातामुळे नवरात्र उत्सव मंडळातील कार्यकर्ते व भाविक व सांगवी पाटण गावातील सर्वच लोक हळ हळ करत होते. त्यांच्या गावी सांगवी पाटण गाववर शोक कळा पसरली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.