Prakash Bandivadekar arrested : कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन मारणे ( टोळीप्रमुख ) याचा साथीदार डॉ.प्रकाश साताप्पा बांदिवडेकर यास इंदौर, मध्यप्रदेश येथून अटक

कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन ऊर्फ गज्या मारणे (टोळीप्रमुख) व त्याच्या साथीदारांवर दि ११ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्राचा तपास श्री. नारायण शिरगांवकर,सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा हे करीत आहेत.
दाखल गुन्ह्राचा तपास करताना गजानन ऊर्फ गज्या मारणे याचा साथीदार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर, रा. चंदगड, कोल्हापूर याचा गुन्ह्रामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यास्तव डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर याचा शोध घेत असताना त्यास त्याची चाहुल लागल्यामुळे तो कोल्हापुर येथून पसार झाला होता. गोपनीय बामीदारांना सक्रीय करुन डॉ. बांदिवडेकर याचा शोध घेत असताना तो इंदौर, मध्यप्रदेश येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखे कडील एक पथक त्याचा शोध घेणेकामी इंदौर येथे पाठविण्यात आले होते.
इंदौर येथे शोध घेत असताना डॉ. बांदिवडेकर मिळून आल्याने त्यास दि. 14/10/2022 रोजी दाखल गुन्ह्रामध्ये अटक करण्यात आली आहे.डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर,रा.चंदगड, कोल्हापूर याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यां मध्ये विविध पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त,श्री.संदिप कर्णिक,मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री.श्रीनिवास घाडगे,सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे 2 श्री.नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 6,गुन्हे शाखा,पुणे शहर कडील पोलीस उप निरीक्षक भैरवनाथ शेळके,पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे,सचिन पवार व ऋषीकेश व्यवहारे यांनी केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.