वैद्यकीय अधिष्ठाता डॉ ठाकूर यांनी ललितला टिबी झाल्याचेपत्र जेल प्रशासनाला दिले : ससून रुग्णांलयाचे अधिष्ठाता डॉ संजय ठाकूर हेच ड्रग्स माफिया ललित पाटील याचे खंदे समर्थक असल्याचा पुरावा सापडला

पुणे दिनांक ३०ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील ससून रुग्णांलयातून ड्रग्जचे रॅकेट चालविणारा ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे खंदे समर्थक म्हणून साथ देणारे ससून रुग्णांलयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ संजय ठाकूर हे चांगलेच मेहरबान असल्याचा पुरावा आता नव्याने समोर आला आहे. यात ललितला टीबी झाल्याचे पत्र मराठी वृत्त वाहिनीच्या हाती लागले आहे.यापत्रानूसार ससूनचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ संजय ठाकूर हेच ललित पाटील यांचे खंदे समर्थक असल्याचा दावा होत आहे.
दरम्यान याप्रकरणी आता या ड्रग्ज प्ररकणात ललित पाटील याला मदत करण्यात ससून रुग्णांलयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ संजय ठाकूर चांगलेच गुंतले आहेत.ठाकूर यांनी एक महिन्यांन पूर्वी ललित पाटील याला टीबी झाल्याचे पत्र ससूनच्या वैद्यकीय अधीक्षक यांना लिहिले होते.दिनांक ७ सप्टेंबर २०२३ लिहिलेले पत्रच या मराठी वृत्त वाहिनीच्या हाती लागले आहे.तसेच या प्रकरणी येरवडा कारागृह विभागाकडे चौकशी केली असता डॉ संजय ठाकूर यांनी ललित पाटील याला टीबी झाल्याचे उत्तर या पत्रात दिले आहे.विषेश म्हणजे ललित पाटील याला तीन वर्षांच्या कालावधीत अनेक आजार झाल्याचे अंत्यंत खुबीने दाखविण्यात आले आहे.यात हर्निया.लठ्ठपणा.पोटदुखी.टीबी.असे अनेक आजार झाल्याचे दाखवले आहे.पण यांपैकी कोणत्याही आजारावर ऑपरेशन झालेलं नाही हे विशेष या कालावधीत फक्त बोगस उपचार ससून रुग्णांलयातून पाटील यांच्यावर सुरू होते असे यात दिसून येत आहे. व ससून रुग्णांलयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.संजय ठाकूर हे ड्रग्ज माफिया ललित पाटील यांचे खंदे समर्थक होते.व हे आता यावरून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.पण राज्य सरकार हे त्यांच्यावर तातडीने कारवाई न करता फक्त समिती नेमून चौकशी करण्याचा फार्स करत आहे.व या चौकशी समितीला मुदतवाढ का दिली जात आहे.सरकार हे प्रकरण गांभीर्याने का घेत नाही. एक नाही.सरकारच्या बाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.नक्कीच यामागे कोणत्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या दबावामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे का? असे देखील अनेकांना पडला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.