Crime : हनीट्रॅपमध्ये मध्ये अडकलेल्या डाॅ. कुरूलकरांच्या जामीनअर्जावर ; ९ ऑगस्टला होणार सुनावणी

पुणे दिनांक २ ऑगस्ट( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) ' डीआरडीओ' चे संचालक डाॅ. प्रदीप कुरूलकर हे काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. हनीट्रॅपममध्ये ते हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे या प्रकरणी कुरूलकर यांना ४मे रोजी ' एटीएस ' ने त्यांना अटक केली आहे. तेव्हा पसून ते तुरुंगात आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर आता ९ ऑगस्टला सुनवणी होणार आहे. आणि याच दिवशी व्हाइट लेयर ॲनालिसिस चाचणीबाबत आदेश होण्याची शक्यता आहे.
दरम्यान एटीएसने सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील जप्त केल्या आहेत. डाॅ.कुरूलकर तुरुंगातून बाहेर येऊन त्या डिव्हाइसमध्ये फेरफार करू शकत नाहीत .असे कुरूलकर यांचेवकील ॲड ॠषिकेश गानू यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हणाले आहे. विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनीअॅड गानू यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर म्हणणे दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. डाॅ. कुरूलकर यांची पाॅलीग्राफ चाचणी व ॲनालिसिस चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी एटीएसने न्यायालयांत केली आहे. परंतु एटीएसने मागणी केलेली पाॅलीग्राफ व व्हाइस लेयर चाचणी करण्यास डाॅ. कुरूलकर यांनी नकार दिला आहे.
या बाबत बुधवारी न्यायालयात युक्तिवाद झाला आहे. पाॅलीग्राफ चाचणी साठी आरोपीची परवानगी आवश्यक असते. पण व्हाइस लेयर चाचणी साठी आरोपीच्या परवानगी गरजेची नसते .आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याने न्यायालयाने व्हाइस लेयर चाचणी परवानगी द्यावी असा युक्तिवाद न्यायालयात ॲड विजय फरगडे यांनी केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.