ललित पाटील हा २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता तब्बल १५ दिवसांपासून होता फरार मुंबई पोलिस तपासा साठी मुंबईला गेले घेऊन : पुण्यातील ससून रुग्णांलयातून पळून गेलेल्या ड्रग माफिया ललित पाटीलच्या चेन्नई येथे मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या आता मदत करणाऱ्यांची होणार पोलखोल

पुणे दिनांक १८ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ड्रग माफिया ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयात गेली ९ महिन्यांन पसून ससून रुग्णालयात उपचार घेत होता.मागील २ ऑ्टोबर रोजी तो सायंकाळी पुणे पोलिसांच्या व ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ससून रुग्णांलयातून पळून गेला होता.पुणे पोलिसांच्या १० पथके त्याचा तपास करीत होत्या.पण तो पुणे पोलिसांच्या हाती लागला नाही.आज त्याला मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चेन्नई येथून अटक करण्यात आली आहे.व त्याला मुंबई पोलीस हे तपासा साठी मुंबईला घेऊन गेले आहेत.
दरम्यान ड्रग माफिया ललित पाटील हा २ ऑक्टोबर रोजी सांयंकाळी पुणे पोलिस व ससून रुग्णांलयातून पळून गेला होता.तो तेथून नेपाळच्या सीमेवर गेला . त्याच्या मागे पुणे पोलिस व मुंबई पोलीस व नाशिक पोलिस होते.यात त्याचा भाऊ भूषण पाटील व अभिषेक बलकवडे हे नेपाळच्या सीमेवर पुणे पोलिसांनी अटक केली परंतु ललित पाटील हा तेथून फरार झाला होता.ललित पाटील फरार झाल्या नंतर राजकीय पक्षांच्या एका सत्ताधारी मंत्र्यांच्या मदतीने ललित पाटील हा ससून रुग्णांलयातून पळून गेला असा आरोप विरोधी पक्षनेते यांनी केला होता.तर पुणे पोलिसांनी त्याला पळून जाण्यास मदत केली.म्हणून दोन अधिकारी यांच्यासह एकूण सहा पोलिस यांचे निलंबन केले होते.आरोग्या विभागाच्या वैद्यकीय अधिष्ठाता सह शिपाई यांची पण चौकशी सुरू आहे.आता ललित पाटील याला आज चेन्नई येथे मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलिस त्याला तपासा साठी मुंबई येथे घेऊन गेले आहेत.दरम्यान ललित पाटील पुणे पोलिसांच्या हाती लागत नाही म्हणून दोनच दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी या शोध मोहीम मधील अधिकारी यांच्या जागी दुसऱ्या अधिकारी यांची पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी नेमणूक केली होती.मुंबई पोलिस यांच्या तपासा नंतरच ड्रग माफिया ललित पाटील यांचा ताबा आता पुणे पोलिसांना मिळणार आहे.आता ललित पाटीलला अटक करण्यात आल्या नंतर त्याला मदत करणांऱ्या अनेक जणांची पोलखोल होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.