पोलिस तपासात ड्रग्स माफिया ललित पाटील यांने घेतली अनेकांची नावे : ड्रग्स माफिया ललित पाटील प्ररकणी व्हाइट कॉलर मोठे धेंडे व डॉक्टर अडकणार पोलिस चौकशीत मोठी पोलखोल

पुणे दिनांक २०ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी घटना पुण्यातील ससून रुग्णांलयातून पोलिसांच्या व ससून रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मदतीने पळून गेलेला ड्रग्स माफिया ललित पाटील हा सध्या मुंबई मधील साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस हे त्यांची कसून चौकशी करत आहे.यात त्यांने स्पष्ट सांगितले की मी पुण्यातील पोलिस व ससून रुग्णालयातील सर्वच कर्मचारी यांना पैसे देत होते.याच बरोबर त्यांने अनेक मोठे खुलासा केला आहे. त्यामुळे यात काही ' व्हाइट कॉलर धेंडे व डॉक्टर ' यांची पोलखोल नक्कीच होणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी एका कंपनीत मार्केटिंग चे काम करणारा व गरीब घरातील ललित पाटील हा सन २०२१ पसून नाशिक येथील शिंदे गावात एक फॅक्टरी टाकतो.व ती सुद्धा एमडी ड्रग्सची व पुढे हाच ड्रग्सचा धंदा संपूर्ण महाराष्ट्रात तरुण पिढीला व्यसनांच्या खाईत ढकलतो हे सामान्य नागरिकांच्या बुध्दीला न पटणारे आहे. तसेच चाकण येथील ड्रग्सच्या प्ररकणी अटक झाल्यानंतर फक्त काहीच दिवस येरवडा कारागृहात राहून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल होतो.व तिथेच राज्यश्रय घेऊन आपला ड्रग्सचा व्यवसाय करतो ससून मधील वार्ड क्रमांक १६ मध्ये आपल्या फ्रेंडली भेटतो व तिथेच धुम्रपान करतो व पोलिस बंदोबस्तात फायस्टार हाॅटेल मध्ये ड्रग्सचा विक्री व मार्केटिंग व आर्थिक व्यवहार करायचा आपला ससून रुग्णालयातील उपचारासाठी सर्वच कर्मचारी यांना आर्थिक रसद पुरवायचा तसेच आपला ड्रग्सचा व्यवसाय बिनबोभाट सुरू रहावा यासाठी पोलिसांना पैसे पुरवायचा हे त्यांने आता पोलिस तपासात सांगितले आहे.व मी ससून रुग्णांलयातून पळालो नाही मला पळवण्यात आले आहे.असे तो म्हणतो हे खरं आहे.ससून रुग्णांलयातून तो पळत नव्हता तो अगदी सांयंकाळी हळुवार पणे बाहेर जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.म्हणजे त्याच्या बोलण्यात नक्कीच तथ्य आहे.आणी या सर्व गोष्टी त्याला राजकीय आश्रय असल्या शिवाय होऊ शकत नाही याला कोणत्याही जोतिष्यांची गरज नाही.व अगदी ही घडामोड शेंबड्या पोराला देखील कळते त्यात आता आरोप व प्रत्यारोपण जोरात सुरू आहे.व दिवाळी आधीच एकमेकांवर आरोपांचे फटाके 🎆 फोडत आहेत.पण आता यात मोठ मोठे धेंडे व डॉक्टर.पोलिस यांना पैसे दिलेल्या ठामपणे सांगत आहेत.यामुळे यात आता राजकीय धेंडेची नावे चौकशी अंती पुढे येणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.