ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या ड्रायव्हरने दोन गोण्या ड्रग्सच्या नदीपात्रात टाकल्या होत्या : नाशिकच्या देवळा तालुक्यातील गिरणा नदीपात्रात सापडले १०० कोटीचे ड्रग्स.मध्यरात्रीत मुंबई पोलिसांचे सर्च ऑपरेशन

पुणे दिनांक २४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई पोलिसांनी आज मध्यरात्रीपासून नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील गिरणा नदीपात्रात सर्चऑपरेशन राविण्यात येऊन ललित पाटील यांच्या चालकांने या नदीपात्रात दोन गोण्या फेकल्या होत्या त्या काढण्यासाठी रात्री दोन वाजल्यापासून सर्च ऑपरेशन राबविण्यात आले .यात मुंबई पोलिसांना यश आले असून या नदी पात्रात दोन ड्रग्सच्या गोण्या सापडल्या असून त्यांची किंमत १०० कोटी पेक्षा जास्त आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मध्यरात्रीपासून मुंबई पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील नदी पात्रात ड्रग्सच्या दोन गोण्या ड्रग्स माफिया ललित पाटील याचा चालक सचिन वाघ यांने टाकल्या होत्या.मुंबई पोलिसांनी मध्यरात्री दोन वाजता या नदीच्या पात्रात अंडर वाॅटर कॅमेरऱ्यांचे सह्हयाने व बोटिंग द्वारे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले.यासर्च ऑपरेशन मोहिमेत मुंबई पोलिसांना यश आले असून नदीच्या पात्रात ड्रग्सच्या दोन गोण्या सापडल्या आहेत.याची किंमत १०० कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.