महापुरुषांचा वादग्रस्त पोस्ट मुळे साताऱ्यात दंगल : सोशल मीडियावर महापुरुषांचे वादग्रस्त पोस्ट टाकल्याच्या वादातून दंगल एकाचा मृत्यू तर चारजण जखमी इंटरनेट सेवा बंद

पुणे दिनांक ११ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील गावात कालमध्यरात्री उशीरा दोन गटात उसळलेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला आहे.तर अन्य चारजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.संतप्त झालेल्या जमावाने वाहने व दुकाने पेटवून दिली आहेत. व एका समाजाच्या प्रार्थनास्थळांची तोडफोड केली आहे.या घटनेमुळे आज सकाळपासून सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. व पुसेसावळी गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान काल मध्यरात्री महापुरुषांची सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने विशिष्ठ समाजाच्या घरांना व दुकाने हातगाडीवर हिंस्र झालेल्या जमावाने दगडफेक करून आग लावण्यास सुरुवात केली.सुमारे २ ते ३ हजार लोकांचा मोठा जमाव आक्रमकपणे जाळपोळ करत पुढे जात होता. या जमावाने एका प्रार्थनास्थळांची तोडफोड करत तिथे असलेल्या ७ते ८ जणांना प्रचंड प्रमाणावर मारहाण केली.यात एकाचा मृत्यू झाला आहे.अन्य चारजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या घटनेनंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे.घटन स्थळी सातारा जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक समीर शेख. अन्य वरिष्ठ अधिकारी हे पुसेसावळी गावात तळ ठोकून आहेत.मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.व आज सकाळ पासून सातारा मधील इंटरनेट सेवा खंडित केली आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुड्डी यांनी एक परिपत्रक काढून नांगरिकांना आवाहन केले आहे की.जिल्हातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवांवर विश्रास ठेऊ नका.कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करु नये.व सोशल मीडियावर तणाव होईल असे मेसेज प्रसारीत करु नये असे आवाहन केले आहे.पुसेसावळी गावात दंगल व जाळपोळ झाल्याची माहिती कळताच खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळीच तातडीने धाव घेतली आहे.व दोन्ही समाजांच्या लोकांशी संपर्क साधून त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.या घटना प्रकरणी औंध येथील पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आज सकाळ पासून इंटरनेट सेवा खंडित केली आहे.सध्या पुसेसावळी गावात व खटाव तालुक्यात तणावपूर्ण शांतता आहे.पोलिसांचा गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.