Crime : मुसळधार पाऊसा मुळे गौरीकुंडामध्ये मलबा कोसळून २ दुकानजमीनदोस्त ; १३ नागरिक बेपत्ता, केदारनाथ यात्रा थांबविली

पुणे दिनांक ४ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) केदारनाथ मध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यातच यात्रा चालू असून या पावसामुळे गौरीकुंड येथे अचानक पणे मोठा मलबा टेकडीवरून मलबा खाली कोसळला आहे.या मलब्या मध्ये २ दुकाने गाडली गेली असून एकूण १३ नागरिक बेपत्ता आहेत. हे नागरिक मंदाकिनी नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सदरची घटना ही शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. ज्या वेळेस मलबा कोसळला तेव्हा नागरिक या दुकानांमध्ये झोपले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सदर घटनास्थळी एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरू केले आहे.
दरम्यान सूत्रांनच्या द्वारे मिळालेल्या माहितीनुसार. गौरीकुंडा भागातील असणा-या दोन दुकानात नागरिक हे झोपले होते.गुरूवारी मध्यरात्री टेकडीवरून अचानक पणे टेकडीवरून मलबा खाली कोसळला व मोठी दुर्घटना घडली आहे. या मलब्या खाली २ दुकाने मलब्या खाली गाडली गेली आहेत. यात एकूण १३ नागरिक दबून बेपत्ता झाल्यांची प्राथमिक माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
बेपत्ता नागरिकांसह नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. गौरीकुंड व सोनप्रयाग भागात गुरूवारी रात्री पसून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गौरीकुंड भागातील मंदाकिनी नदी दुथडी भरून वाहत आहे .व जोरदार पाऊस कोसळत असल्या मुळे टेकडीवरून मलबा कोसळून खाली रोडवर येत आहे. त्यामुळे या भागात मोठे अपघात होत आहेत.
सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून गौरीकुंड व सोनप्रयाग या भागात भाविकांची प्रचंड गर्दी आहे.गुरूवार पसून या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. व टेकडीवरून मलबा खाली कोसळत आहे. यातच २ दुकाने या मलब्या खाली गाडली गेली आहेत. या दुकानांमध्ये झोपलेले हे नागरिक बेपत्ता झाले आहेत. सदरची ही दुकाने ही मंदाकिनी नदीला लागून असल्या मुळे हे १३ नागरिक नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घटना स्थळावर एसडीआरएफची टीम बचाव कार्य करत असून यातच मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बचाव कार्यत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सध्या बचाव कार्य बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस थांबल्या नंतर परत बचाव कार्य सुरू करण्यात येईल. या दुर्घटनेत मृत्यूचा आकडा वाढु शकतो. सध्या केदारनाथा यात्रा थांबविली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.