छत्तीसगड मध्ये दहशतीचे वातावरण : छत्तीसगड मध्ये प्रचारादरम्यान भाजपच्या मोठ्या नेत्यांची नक्षलवाद्यांनकडून गोळी झाडून हत्या.संपूर्ण छत्तीसगड हादरले

पुणे दिनांक ४ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) छत्तीसगड येथे विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून दरम्यान आता एक नवीन अपडेट समोर येत असून प्रचारात सहभागी असलेल्या एका भाजपच्या मोठ्या नेत्यांची हत्या करण्यात आली आहे.त्यामुळे संपूर्ण छत्तीसगड मध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचे सावट निर्माण झाले आहे.दरम्यान पहिल्या टप्प्यातील मतदान आधीच ही हत्या झाल्यांने याभागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांनी भाजपालाच टार्गेट करून भाजप नेत्यांवर गोळ्या झाडून हत्या केली आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. छत्तीसगड मध्ये नक्षलवाद्यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रतन दुबे यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे.नारायणपूर विधानसभा मतदारसंघातील कऔशलनगर भागात उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी गेले होते.प्रचार वरुन परत येत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावक्ष गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.दरम्याण या मतदार संघातील मतदान हे ७ नोव्हेंबरला होते. या हत्या मुळे या भागात नक्षलवाद्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.