ईडीच्या अधिकाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये पाच जणांना विरुद्ध केला गुन्हा दाखल : ' ईडी' पुण्यात मोठी छापेमारी बनावट कंपनी स्थापन करुन चांगला परताव्यांचे आमिष दाखवून पुणेकरांना घातला १०० कोटींचा गंडा

पुणे दिनांक १० ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात बनावट कंपनींची स्थापन करुन जास्त परताव्यांचे आमिष दाखवून पुणेकर नागरिकांची तब्बल १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने सक्तवसुली संचालनालयाने आज पुण्यातील कात्रज आंबेगाव मध्ये मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.
दरम्यान या छापेमारी नंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये पाच जणांना विरुद्ध फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यातील पाच आरोपींनी बनावट कंपनींची स्थापना करुन गुंतवणूक दारांना जादा परताव्यांचे आमिष दाखवून राज्यभरातील गुंतवणूक दारांची तब्बल १०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.दरम्यान याबाबत ईडीच्या वतीने कात्रज भागात कारवाई केली आहे.परंतू यातील पाचही आरोपी फरार झाले आहेत.आरोपी यांचा तपास सुरू आहे. दरम्यान फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपी यांची नावे.१) विनोद तुकाराम खुंटे,२) संतोष तुकाराम खुंटे ३) मंगेश खुंटे ४)किरण पितांबर अनारसे ५) अजिंक्य बडवे अशी नावे आहेत.
दरम्यान ईडीच्या पथकाने आज दिनांक १० ऑक्टोबर मंगळवारी कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक येथील आयपीएस ग्रुप ऑफर कंपनी व ग्लोबल अॅफिलेट कंपनीवर छापा टाकला होता. आरोपींनी गुंतवणूक दारांकडून पैसे गोळा केले व रक्कम कंपनीच्या खात्यात पैसे न भरता.आरोपींनी बनावट नावांने खाते काढले होते. व या खात्यात गुंतवणूकदारांना कडून गोळा केलेली रक्कम जमा करण्यात आली नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.