बाॅलिवूड मधील अनेक सेलेब्रिटी ईडीच्या रडारवर मुंबई मधील अंधेरी व इतर पाच ठिकाणी छापेमारी : मोठ्या प्राॉडक्शन हाऊसवर ईडीची छापेमारी महादेव बेटिंग अॅपमुळे बाॅलिवूड कलाकारांचे धाबे दणाणले

पुणे दिनांक ७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून आर्थिक रसद मुंबई मधील कुरैशी प्राॅडक्शन हाऊस वर ईडीने छापेमारी केली आहे.त्यामुळे आता बाॅलिवूड कलाकारांचे धाबे दणाणले आहेत.दरम्यान ईडीच्या वतीने अभिनेता रणबीर कपूर.श्रध्दा कपूर.व काॅमेडी किंग कपिल शर्मा.सह अनेक सेलेब्रिटी यांना समन्स बजावले आहे.तर यातील अनेक मान्यवर कलाकार ईडीच्या रडारवर आहेत.या सर्व कलाकार यांच्यावर मुंबई मधील कुरैशी प्राॅडक्शन हाऊसच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे.आज ईडीच्या वतीने मुंबई मधील अंधेरी येथील पाच ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. एका मोठ्या राजकीय पक्षांच्या संबंधीत वसीम कुरैशी यांचे हे प्राॅडक्शन हाऊस असल्याचीही माहिती सूत्रांनच्या द्वारे मिळत आहे.
दरम्यान कुरैशी प्राॅडक्शन हाऊस हे बाॅलिवूड मधील एक सर्वात मोठे हाऊस आहे.आज या प्राॅडक्शन हाऊसच्या मुंबईतील अंधेरी येथील कार्यालयावर ईडीच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान या प्राॅडक्शन हाऊसच्या माध्यमातून महेश मांजरेकर निर्मित आगामी वेडात वीर दौडले सात या मराठी चित्रपटात कुरैशी प्राॅडक्शन हाऊसची म्हत्वाची भूमिका आहे.अनेक मोठ मोठ्या दिग्गज बाॅलिवूड कलाकार व राजकीय नेते मंडळी यांच्या बरोबर कुरेशी याचे संबंध असून त्याचा सोबत फोटो देखील आहेत.आता ईडीच्या वतीने अचानक पणे या प्राॅडक्शन हाऊसवर धाड टाकल्याने अनेक सेलेब्रिटी व राजकीय नेत्यांचे देखील धाबे दणाणले आहेत.
दरम्यान महादेव बेटिंग अॅप प्रकरण मागील काही महिन्यांपासून चांगलेच गाजले आहे.ईडीच्या वतीने चार दिवसांपूर्वीच याबाबत बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला समन्स बजावण्यात आले आहे.यानतंर हुमा कुरेशी.हिना खान.काॅमेडी मॅन कपिल शर्मा.व श्रध्दा कपूर.या सर्व जणांना समन्स बजावण्यात आले आहे.आज या प्रकरणी या प्राॅडक्शन हाऊस व अन्य पाच ठिकाणी ईडीच्या वतीने छापेमारी करण्यात आली आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी ईडीच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून तब्बल ४१७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.दरम्यान या प्रकरणी ईडीकडून महादेव बेटिंगची पाळेमुळे खोदून काढले जात आहे.या ईडीच्या तपासात ५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे.हे अॅप चालविणारा सौरभ चंद्राकर यांच्यावर अनेक सेलेब्रिटी यांना हवाला मार्फत पैसे दिल्याचा आरोप आहे.आता या पेमेंट बाबत ईडी या सर्व कलाकारांची चौकशी करत आहे.दरम्यान सौरभ यांने फेब्रुवारी २०२३ मध्ये दुबई येथे लग्न केले होते.यावेळी दुबईत झालेल्या सोहळ्याला परफाॅर्म करण्या करिता त्यांने अनेक सेलेब्रिटी व कलाकारांना आम्रंत्रण दिले होते.दरम्यान याबाबत ईडी अजून काही कलाकार यांना समन्स बजवू शकते यात पुलकित सम्राट.भारती सिंह.सनी लिओनी.व कृष्णा अभिषेक हे स्टार्स मंडळी ईडीच्या रडारवर आहेत.अशी माहिती सूत्रांन द्वारे मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.