ED Raid : पिंपरीत सेवा विकास बँकेच्या माजी अध्यक्षांच्या घरावर ईडीचा छापा

पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने कही दिवसांपूर्वी छापे टाकले होते. यावेळी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप करून तब्बल 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं.
त्यानंतर आता अमर मुलचंदानीसह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे.
सर्च ऑपरेशन सुरू असतांना घरातच लपून बसलेल्या मुलचंदानीनं मोबाईलमधील बेहिशोबी कर्ज प्रकरणाशी संबधित डेटा डिलीट करून पुरावे नष्ट केले आणि अमर मुलचंदानीला लपवून ठेवण्यासाठी तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी कुटुंबीयांनी मदत केल्याची ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रार वरून गुन्हे दाखल करण्यात आले असून रात्री उशीरा अमर मुलचंदानी यांच्या पत्नी आणि 3 भावांसह एका कामगाराला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे.
बँकेच्या संचालकांनी कर्जांचे 124 बनावट प्रस्ताव मंजूर करून जवळपास 430 कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना वितरित केले. कर्ज मिळण्याची पात्रता, परतफेडीची क्षमता व अन्य निकष न तपासताच पैशांचे वाटप करण्यात आल्याचे आरोप झाले होते. याप्रकरणी अमर मुलचंदानी यांच्यासह इतर संचालकांना अटक झाली होती. आता या प्रकरणात ते जामिनावर बाहेर आहेत.
बँकेने बनावट कागदपत्रे वापरून, त्याच्या आधारे कर्जवाटप चारशे कोटीपेंक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. याच प्रकरणी मुलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती.आता पुन्हा ईडीने छापा टाकल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान आता मुलचंदानीसह या 4 जणांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.