आज मध्यरात्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई : DHFL घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई.वाधवान यांची ७०.३९ कोटीची मालमत्ता केली जप्त

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ईडीच्या वतीने वाधवान बंधूंची एकूण ७०.३९ कोटी रुपयांची मालमत्ता तात्तपुरत्या स्वरूपात मध्यरात्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.डीएचएफएलचे वाधवान बंधूं हे संचालक असून त्यांच्यावर या बॅकेत घोटाळा केल्या प्रकरणी आरोप असून ते दोघेही अटक असून ते तुरुंगात आहेत.
दरम्यान डीएचएफएल बॅकेचे कपिल वाधवान व धीरज वाधवान हे संचालक असून यांच्यावर ३४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी आरोप आहेत.ईडीकडून या घोटाळ्याच्या तपास सुरू आहे काल गुरुवारी मध्यरात्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ईडीने छापेमारी करून २८.५८कोटीची मालमत्ता.५ कोटी रुपयांचे घड्याळे १०.७१ कोटींचे हिरेजडित दागिने ९ कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर मधील २० टक्के स्टेक व वांद्रे येथील १७.१० कोटी रुपयांचे फ्लॅट्स आदींचा समावेश आहे.या दोघा भावांवर सरकारचे अनुदान लाटल्याचा आरोप आहे.तसेच बांद्रा येथे DHFLबॅकेची एक खोटी शाखा उघडली व त्यामधून १४ हजार ४६ कोटी रुपयांची पंतप्रधान आवास योजनेची खोटी कर्ज खाती तयार केली.असा आरोप सीबीआयच्या वतीने करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.