लाचलुचपत विभागाच्या वतीने आवळल्या मुसक्या : भूमिअभिलेखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांला २ हजार ५०० रूपायांची लाच घेताना अटक

पुणे दिनांक २६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भूमीिअभिलेखा कार्यालयातील परिक्षण भूमापक कर्मचाऱ्यास शेतकऱ्यांकडून २ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या वतीने रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव खंडू रेंवडे असे आहे.
दरम्यान याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार तक्रारदार शेतकरी यांची करमाळा तालुक्यातील मोरवड येथे शेत जमीन आहे.सदर जमिनीची मोजणी करून हद्दी निश्चिती करुन देणे व व तसा नकाशा देण्या करिता तातडीच्या मोजणी करीता कार्यालयात तीन हजार रुपये शासकीय फी भरली होती.दरम्यान या कामा करीता कर्मचारी खंडू यांने शेतकरी यांच्या कडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती.व नंतर तोडजोड करून २ हजार ५०० रुपये लाच देण्याचे ठरले होते या बाबत शेतकरी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागने या कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.