Crime : जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची जमीनीच्या वादातून हत्या मारेकरी फरार

पुणे दिनांक ८( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची जमीनीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयता व कु-हाड च्या सहाय्याने हल्ला केला व हल्लेखोर फरार झाले आहेत. सदर घटना ७.जुलै रोजी सायंकाळी ७.वाजण्याच्या सुमारास झाली आहे. पानसरे यांना तातडीने पुणे येथे उपचारा करिता तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांना डाॅक्टर यांनी तपासणी करून मृत घोषित केले आहे.
दरम्यान या हल्ल्यात आणखी दोघे जखमी झाले आहेत त्यांच्या वर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्या नंतर आरोपी हे फरार झाले आहेत त्यांचा शोधा करिता पोलीस पथक रवान करण्यात आले आहे. पानसरे यांची हत्या जमीनीच्या वादातून झाली आहे. यात हल्ल्यात आणखी दोघे जखमी झाले आहेत त्यांच्या वर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पानसरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक असून ते सुप्रिया सुळे समर्थक आहेत त्यांच्या हत्या मुळे जेजुरी मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हल्लेखोरांच्या शोधा करिता पुणे ग्रामीण पोलीसांची पथके रवाना झाली आहेत. अशी माहीती पोलीस सूत्रांन कडे समजत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.