Crime : तस्करी करून देशात आणलेली ३० कोटी रूपयांची महागडी घड्याळे केली जप्त

पुणे दिनांक २३( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) तस्करी करून देशात आणलेली ३०कोटी रुपये किंमतीची महागाडी घड्याळे. आज महसूल गुप्तचर संचालनालयने ( डीआरआय) ने ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनच्या द्वारे मिळाली आहे. डीआरआयच्या मुंबई विभागाच्या पथकाला या बाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एका व्यक्तीच्या निवासी परीसरात ३० पेक्षा जास्त महागडी परदेशी घड्याळे ठेवलेली होती.
दरम्यान सदरचा व्यक्ती हा परदेशी गेला असून त्यांने भारतात परत येताना कोणतेही शुल्क न भरता अशाच प्रकारची महागडी परदेशी घड्याळे आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती विभागाला मिळाली. या गोपनीय माहिती नुसार. या विभागाच्या पथकातील अधिका-यांनी सिंगापूर कोलकाता येथे असलेल्या या प्रवाशाला ताब्यात घेतले असता त्याच्या कडे ग्र्युबेल फोर्सी या अंत्यत महागड्या ब्रँडचे एक घड्याळ सापडले. त्यांने या घड्याळची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकार-यांपासून लपवली होती. या प्रवाशाला सीमा शुल्क कायदा १९६२ मधील कलम १०४ अंतर्गत अटक करण्यात आले आहे.
दरम्यान त्या नंतर प्रवाशाच्या प्रतिष्ठित निवासी संकुलातील रहिवासी परिसरावर डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकातील अधिकारी यांनी छापा घालून ग्रुबेल फोर्सी पर्नेल लुई व्हीतों .एमबी ॲड एफ.मॅड .रोलेक्स .ऑडमार्स .पीजाॅ .रिचर्ड मिले.इत्यादी परदेशी ब्रँडची ३४ अंत्यत महागडी घड्याळे ताब्यात घेण्यात आली. या पैकी अनेक घड्याळे अत्यंत उच्च किंमतीची आहेत. या सर्व घड्याळाची बाजारातील एकूण किंमत ३० कोटी रूपायांहून जास्त आहे. परदेशाहून येताना सामानात घड्याळे आणल्यास त्याच्या किंमतीवर सामानविषयक नियमानुसार ३८.५% सीमा शुल्क भरावे लागते. या व्यक्तीने शुल्क न भरता देशात घड्याळे आणल्याचे निदर्शनास आले आहे. या कारवाई मुळे अनेकदा परदेश वा-या करून त्या माध्यमातून केलेला गंभीर स्वरूपाचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून त्यातून तस्कारीच्या वैशिष्ट्यपूर्ण तसेच अत्याधुनिक पद्धती शोधून काढून गुन्हेगारांना पकडण्याची डीआरआयच्या अधिकारी यांनी त्यांची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.