स्फोटात आजुबाजूच्या घरांना हादरे .मृत्यूचा आकडा वाढू शकतो : उल्हासनगरमध्ये सेंच्युरी कंपनीत स्फोट.भीषण दुर्घटनेत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू अनेक कामगार जखमी

पुणे दिनांक २३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील शहाड भागातील सेंच्युरी रेयाॅन कंपनी मधील CS2 या डिपार्टमेंटमध्ये अचानक पणे जोरदार स्फोट झाला.या भीषण स्फोटात पाच कामगार ठार झाले तर अनेक कामगार हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान याठिकाणी स्फोट झाल्यानंतर कंपनीच्या वतीने या संपूर्ण भागाला बॅरीगेंटिग करण्यात आले आहे.असून कंपनी प्रशासनाच्या वतीने आत प्रवेश करण्यास माध्यमांच्या प्रतिनिधींना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आतील स्फोटाची भयानक परिस्थिती असू शकते.या स्फोटा मुळे आजुबाजूच्या घरांना या स्फोटांचा हादरा बसला आहे.असे स्थानिक नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्फोट कशामुळे झाला हे समजू शकले नाही.पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.व या स्फोटांचा तपास करण्यात येत आहे.दरम्यान हा स्फोट खूप मोठा झाला आहे.यात अनेक कामगार गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांना उपचार करिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान यातील काही कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.यात मृत्यूचा आकडा वाढू शकतो.कंपनीच्या वतीने मृत कामगाराची आकडेवारी लपविण्याचा प्रयत्न कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे.पण प्रत्क्यक्षात मृत कामगाराची संख्या जास्त असल्याचे कामगारांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.