Crimes : खंडणी व दहशत पसरविणारा तडीपार गुंड वानवडी पोलिसांच्या जाळ्यात.

पुणे दिनांक १३.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम)वानवडी पोलीसांना पाहीजे असलेल्या सराईत व फरार असलेला गुंड वानवडी पोलिसांच्य जाळ्यात.
अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव सचिन उर्फ टिंकया पोपट शेलार ( राहणार आझाद नगर वानवडी पुणे)असे आहे. या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की प्रभारी पोलीस संतोष सोनवणे व पोलीस अंमलदार वानवडी पोलीस ठाण्याच्याहद्दीत पेट्रोलिग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की टिंकया शेलार हा हा हाॅटेल स्टेप इन समोर साळुंखे विहार येथे असल्याचे समजल्यानंतर त्याला फिल्मी स्टाईल ने त्याच्या मुसक्य आवळल्या आहेत.
सदर तडीपार गुंडास पोलीस उपायुक्त परीमंङळ ५.पुणे.शहर यांनी १६.मार्च पसून दोन वर्षां करीता पिंपरी-चिंचवड. पुणे शहर. व पुणे जिल्ह्य़ातून तडीपार केले होते. तो तडीपार असतांना देखील पुणे शहरात बेकायदेशीर रित्य प्रवेश करून तसेच त्याच्या वर गुन्हा दाखल झाल्यानंतरही तो वेषांतर करून आपले अस्तित्व लपवून वावरत होता. सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा. पोलीस उपायुक्त परीमंडळ ५.पुणे शहर विक्रांत देशमुख. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर साळवे. यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे. व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे. सहाय्यक पोलीस फौजदार रासगे. हरिदास कदम. पोलीस अंमलदार विठ्ठल चोरमले. अमोल गायकवाड. निळकंठ राठोड. यांनी केले आहे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.