बनावट काॅल सेंटरच्या माध्यमातून शेकडो नागरिकांची फसवणूकीचा पोलिसांना संशय : मुंबईतील बनावट काॅल सेंटरचा प्रर्दफाश.मुंबई पोलिसांनी आवळल्या चारजणांच्या मुसक्या

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई मधील पवई येथील बोगस काॅल सेंटरवर पवई एमआयडीसी पोलिसांनी मोठी छापेमारी करून चारजणांना अटक केली आहे.या बनावट काॅल सेंटरच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचा पवई पोलिसांना संशय आहे.यातील अन्य संशयित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.मुंबई जवळील पवई व साकी विहार भागात बनावट पणे चालणाऱ्या बोगस काॅल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे.तांत्रिक विष्लेनावरुन काॅल सेंटरच्या माध्यमातून अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याची माहिती मुंबई मधील एमआयडीसी पोलिसांना मिळाली पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई करुन चारजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.याछापेमारी दरम्यान काही जण पळून गेले असून पोलिस त्यांचा तपास करीत आहेत.
दरम्यान या प्रकरणी छापेमारीत अटक करण्यात आलेल्या चार जणांची नावे.१) आदिल निसार अहमद सय्यद २) मार्शल सेल्वराज ३) अस्फाज अली मोसीन अली ४) अविनाश गोपाळ मुदलीयार. अशी आहेत.तर यांचे अन्य साथीदार पळून गेले आहेत.पोलिसांनी त्यांच्या कडून २५ लॅपटॉप अंदाजे ४ लाख २५ हजार व ६ मोबाईल फोन ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्ररकणी पोलिसांनी पवई पोलिस स्टेशन मध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.