Fake Job : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांना टोपी घालणारा भामटा गजाआड

चाकण मध्ये महाराष्ट्रातील मंत्री माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. तसेच सरकारी अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. असे सांगून अनेक युवकांना टोपी ( Fake Job ) घालणाऱ्या भामट्याला चाकण पोलिसांनी गजाआड केली आहे.
सदरच्या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की. अनिल राम खेलावन चैरासिया.( वय.४३. रा.चाकण.ता.खेड.जि.पुणे ) असे गजाआड केलेल्या भामट्याचे नाव आहे याने एकूण वीस जणांना माझे महाराष्ट्रातील अनेक मंत्री यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. तसेच आरटीओ मधील मोठमोठे अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. तुम्हाला आरटीओ परिवहन खात्यात नोकरी लावतो. असे त्यांनी नोकरीचे ( Fake Job ) आम्हीच दाखवून अनेक होतकरू व बेरोजगार युवा युवकांकडून. लाखो रुपये घेतले व त्यांना बनावट नियुक्तीपत्र देऊन त्यांना टोपी घातली.
हा प्रकार गेली दोन वर्षांपासून चालत होता. या फसवणुकीबाबत प्रमोद घोडके यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी चौरासिया याला गजाआड करुन. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर फसवणुकी बाबत अजून कोण कोणत्या युवकाची फसवणूक झाली असेल त्यांनी चाकण पोलीस स्टेशनमध्ये. संपर्क साधावा असे पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.