Police arrested fake police : बदली करण्या साठी पोलीसांनकडेच पैशांची मागणी करणारा तोतया पोलीस निरीक्षक पाटील गजाआड

बदलीसाठी पैशाची मागणी करणारा एक कॉल गुन्हे शाखेतील एका कर्मचाऱ्याला आल्यानंतर पथकाने सापळा रचून आयुक्तालयाच्या गेटवर बनावट माणसाला अटक केली आहे. अमित जगन्नाथ कांबळे (वय ३५ रा. पुणे फिरस्ता) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रुस्तुम मुजावर (वय ४७) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मुजावर हे शहर पोलीस दलात नोकरीला आहेत. गुन्हे शाखेत कर्तव्यावर आहेत.
पैशाची मागणी
शनिवारी ५.३० सुमारास कांबळे यांनी फोन करून पोलीस निरीक्षक पाटील बोलत असल्याचे, सांगून तुमची तसेच तुमच्या ओळखीतील व्यक्तीची बदली करायची असेल, तर सांगा असे म्हटले. त्यासाठी लागणाऱ्या पैशाची मागणी करून फोन कट केला. त्याने सांगितलेले नाव आणि त्याच्या बोलण्यावरून तो बनावट असल्याचे मुजावर यांच्या लक्षात आले.
गुन्हा कबूल
परत ९.३० वाजता मुजावर यांना कांबळे यांनी परत फोन करून, मला किती वेळ थांबवता मी पोलीस आयुक्त गेट क्रमांक ३ थांबलो आहे, असे सांगितले. याबाबत मुजावर याने वरिष्ठ अधिकारी संदीप भोसले यांना याची माहिती ऊन त्याला भेटण्यासाठी पोलीस आयुक्तालाच्या गेटवर गेले. त्यावेळी कांबळे यांनी त्यांना तुम्हीच का मुजावर? असे विचारल, पोलिसांनी त्याला कोठे नेमणूक आहे ? असे विचारले असताना त्यांनी उडवाउडवी उत्तरे दिले, त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.