Sapna chaudhary arrested : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी ला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक व नंतर सुटका

हरियाणा मधील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिला लखनऊ मध्ये. एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या पूर्वी तिच्या विरोधा मध्ये वाॅरंट दाखल केल्यानंतर ती १९ सप्टेंबरला लखनऊ न्यायालयात हजर झाली होती. सुरुवातीला तिला अटक केली होती, पण एका अटीवर न्यायालयाने तिची सुटका केली असून ती आट म्हणजे पुढे न्यायालयात हजर राहून सहकार्य करेल.
या अटीवर तिची सुटका केल्याची माहिती एका वृत्त वाहिनीच्या माध्यमातून मिळत आहे. आता तिला पुढील कारवाईसाठी 30 सप्टेंबरला न्यायालयात हजर झाल्यानंतरच या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सपनाने सन २०१८. वर्षी लखनऊ मधील एका कार्यक्रमात आयोजकाकडून आगाऊ पैसे घेऊन तिने आयोजकांनी ठेवलेल्या कार्यक्रमाला गेली नाही. आयोजकांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. गायकाला फसवणुकी प्रकरणी अटक झाली. सपना अटक झाल्यानंतर बाहेर आली. तिच्या विरोधात असलेले फसवणुकीचे वॉरंट परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. ऑगस्ट २०२२ . मध्ये पुन्हा सपना हिच्या विरोधात अटक वॉरंट दाखल करण्यात आले होते. व आयोजकांनी तिला न्यायालयात खेचले होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.