२७ ऑक्टोबर रोजी इंग्रजी मध्ये ईमेल गावदेवी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींना जीवे ठार मारण्याची धमकी ईमेल द्वारे देउन २० कोटींची केली मागणी

पुणे दिनांक २८ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यांने उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.धमकी देण्यांऱ्या अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या कडे २० कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली आहे.पैसे न दिल्यास आमचे दोन शार्पशुटर हे तुम्हाला मारतील तुम्ही आम्हाला हआलक्यआत घेऊ नका.नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील असा ईमेल हा इंग्रजीत पाठविला आहे.याबाबत मुंबईतील गावदेवी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीने भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ईमेल वर मेल इंग्रजी मध्ये करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन २० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.व आम्हाला हलक्यात घेऊ नका आमचे दोन शार्पशुटर हे मुंबईत असून ते तुम्हाला ठार मारतील अशी धमकी दिली आहे.या धमकी नंतर अंबानी यांचे सुरक्षाव्यवस्था अधिकारी यांनी मुंबई मधील गावदेवी पोलिस स्टेशन मध्ये रितसर फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम ३७८ व ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.व तपास सुरू केला आहे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.