Crime : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाट पोलिसचौकी जवळ भीषण अपघात;मुंबई कडे जाण्यासाठी वाहनांच्या सहा किलो मीटर प्रर्यत रांगाच रांगा

पुणे दिनांक ३ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंबई ते पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचा अपघात बोरघाट पोलिस चौकी जवळ झाला आहे. या अपघातात एक ट्रक हा काच घेऊन जात होता.अपघाता नंतर संपूर्ण महामार्गावर काचाचं सडा पडलेला आहे.या अपघाता नंतर मुंबई कडे जाणारी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. वाहनांच्या तब्बल सहा किलो मीटर प्रयत्न वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
दरम्यान या अपघातात पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व मोठी वाहने अनेक ठिक ठिकाणी थांबवून ठेवण्यात आली आहेत तर तर छोटी वाहने ही खोपोलीतून जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून वळविण्यात आले आहे. या ट्रक अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातांची माहिती मिळताच पोलिस व आय आर बी चे पथक घटना स्थळावर पोहचले आहेत. व यात काही सामाजिक कार्यकर्ते देखील बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक हाटविण्याचे काम चालू आहे.
दरम्यान अपघात मधील ट्रक मधील महामार्गावर पडलेल्या काचा या देखील बाजूला कराव्या लागणार आहेत.अन्यथा वाहनांच्या टायर पंक्चर होउन पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरसोली टोलनाका व वलवण गावाजवळ मोठी वाहने आडवून ठेवल्या मुळे महामार्गावर तब्बल सहा किलो मीटर पर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याआहेत. व महामार्गावर आता रोजच अपघाताची मालिकाच सुरू आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.