Crime : चंद्रपुरात गोळीबार भाजप पदाधिका-याच्या पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू

पुणे दिनांक २४ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात भाजप पदाधिका-याच्या पत्नी पूर्वशा यांना दोन गोळ्या लागल्या व त्यातील एक गोळी त्यांच्या छातीत लागल्यांने त्यांचा घटना स्थळावरच मृत्यू झाला आहे. काल रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केला. यात भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीला दोन गोळ्या लागल्या व गोळीबारात अज्ञात एक व्यक्ती जखमी झाली आहे. त्याला उपचारा करिता हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान सूत्रांनच्या द्वारे मिळालेल्या माहितीनुसार राजुरा शहरात अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात पूर्वशा सचिन डोहे ( वय २७ रा.राजुरा जि.चंद्रपूर ) यांचा यात मृत्यू झाला आहे. भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे हे त्यांचे पती आहेत. या गोळीबारात लल्ली या नावाचा व्यक्ती जखमी झाला आहे. राजुरा शहरातील सोमनाथपुर वार्डात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सचिन डोहे यांच्या घरासमोर हा गोळीबार केला आहे.
घराबाहेर आवाज आल्याने पूर्वशा या घराबाहेर आल्या .यात पूर्वशा यांना दोन गोळ्या लागल्या एक गोळी थेट छातीत घुसली व त्यांचा घटना स्थळावरच मृत्यू झाला. यात जखमी झालेल्या लल्ली याला तातडीने चंद्रपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबार प्रकरणी कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या आरोपी फरार आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत. या गोळीबारा मुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.