मनसे जरांगे पाटील यांचा उपोषणाचा १४ वा दिवस : ' पहिला आरक्षणाचा जीआर, नंतर उपचार ' जरांगे पाटील आक्रमक वैद्यकीय तपासणीस दिला नकार

पुणे दिनांक ११सप्टेबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे दरम्यान आज सोमवारी वैद्यकीय उपचारासाठी एक पथक दाखल झाले आहेत.पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.मराठा आरक्षणाचा जीआर आल्या नंतरच वैद्यकीय तपासणी व उपचार घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १४ दिवसा पासून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू केले आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाचा त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे.व पोलिसांनी उपोषण कर्ते व आंदोलन कर्ते व गावातील वयोवृद्ध महिला व नागरिक यांच्यावर लाठीचार्ज केला .व तसेच गोळीबार केला.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात यांचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले आहेत.ठिक ठिकाणी या घटनेचा निषेध केला जात आहे.आज देखील ठाण्यात बंद करण्यात आला आहे.सरकारच्या वतीने आतापर्यंत तीन बैठका होऊन यावर काही तोडगा निघाला नाही.व उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण सुरू ठेवले आहे.व ते उपोषणावर ठाम आहेत.आज सकाळी तपासणी साठी डॉक्टर यांचे पथक आले असता त्यांनी तपासणी करण्यास नकार दिला आहे.त्यांनी म्हणाले आहे की पहिला मराठा आरक्षणाचा जीआर व नंतरच उपचार अशी ठाम भूमिका त्यांनी आज सकाळी घेतली आहे. आज सह्याद्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात म्हत्वाची तातडीने बैठक बोलावली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.