बाॅम्ब असल्याचा दावा केल्याने मुंबई विमानतळ प्रशासनाची धावपळ : आधी बॅगेत बाॅम्बची धमकी नंतर मेडिकल इमर्जन्सी पुण्यावरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं मुंबईत लॅंडिंग

पुणे दिनांक २१ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील लोहगाव विमानतळावरून दिल्लीकडे जाणाऱ्या अक्सा एअर विमानातील एका प्रवाशांच्या छातीत प्रचंड वेदना होत होत्या. या विमानाचं मुंबईतील विमानतळांवर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले व प्रवाशांचे चेकअप दरम्यान त्यांने सांगितले की आपल्या बॅगेत बाॅम्ब असल्याचा दावा केला यावेळी मुंबई विमानतळावरील प्रशासनाचे धाबे दणाणले.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री पुण्यावरून दिल्लीकडे जाणाऱ्या अक्सा एअर विमानाचं मेडिकल एमर्जन्सी विमानतळांवर लॅंडिंग करण्यात आले.यावेळी प्रवाशांने आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार क्रू मेंबर्सकडे केली.त्या नंतर हे विमानाचं मुंबईतील विमानतळांवर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले.यावेळी मुंबई मधील विमानतळार उतरताच छातीत दुखत असल्याचे सांगणांऱ्या प्रवाशांने त्याच्या बॅगेत बाॅम्ब असल्याचे सांगितले त्यामुळे तातडीने बाॅम्ब शोधक पथकाला बोलविण्यात आले.परंतू त्यांच्या बॅगेत कोणतीच संशयास्पद वस्तू मिळाली नाही.तपासा दरम्यान प्रवाशांच्या नातेवाईक यांनी तो औषंधाच्या प्रभावामुळे बरळत असल्याचे सांगितले.याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.दरम्यान यावेळी या विमानात एकूण १८५ प्रवासी होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.