सुनावणीच्या वेळी न्यायाधीशांनी पोलिसांची केली कानउघाडणी : ड्रग्ज प्ररकणी भूषण पाटील व अभिषेक बलकवडे दोघांना पाच दिवसांची पोलिस कस्टडी

पुणे दिनांक ११ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ससून रुग्णालयातून पोलिसांच्या समोरच फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील हा पळून गेल्यानंतर पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून त्यांचा भाऊ भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना अटक करुन पुणे पोलिसांनी त्या दोघांना आज शिवाजी नगर येथील न्यायालयात हजर केले.व आरोपी यांची न्यायालयांत कस्टडी मागितली या दोघांना पाच दिवसांची पोलिस कस्टडी दिली . पण यावेळी न्यायालयाने पोलिसांना चांगलेच खडसावून त्यांची कान उघडणी यावेळी केली आहे.
दरम्यान या दोघांजणांना न्यायालयात हजर केले असता.पोलिसांनी यावेळी आरोपी यांची कस्टडी मागितली यावेळी न्यायालयाने ललित पाटील तुमच्या ताब्यात असताना त्याला नीट सांभाळता आले नाही असे बोलून पोलिसांची कानउघडणी यावेळी केली आहे.पुणे पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना अटक करुन विमानाने रात्री पुण्यात आणले आहे.यावेळी न्यायालयाने या दोघांना तुमचे वकील कोण? असा प्रश्न उपस्थित केला व यावर आरोपी यांनी सांगितले आम्ही वकील दिला नाही.असे सांगितले त्यानंतर न्यायालयाने या दोन आरोपींना सरकारी खर्चाने वकील देण्याचा आदेश दिला.यावेळी न्यायालयाने कोर्टात उपस्थित असलेल्या वकिलांना विचारले असता एका वकिलाने वकिीलपत्र घेण्यास सहमती दर्शवली यावेळी पोलिसांनी १४ दिवसांची पोलिस कस्टडी मागितली पण न्यायालयाने पाच दिवसांची कस्टडी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.