पाचजणांना रुग्णांलयात उपचारासाठी दाखल : मुंबईतील वांद्रे भागात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट पाचजण गंभीररीत्या जखमी

पुणे दिनांक १८ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील वांद्रे भागांतील फिटर गल्लीतील एका घरात आज सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा अचानकपणे स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकूण पाचजण गंभीररीत्य जखमी झाले असून.यात जखमी झालेल्या पाचही जणांना तातडीने भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्याची नावं १) निखिल जोगेश दास(वय.५३) २) राकेश रामजनम शर्मा (वय ३८) ३) अॅथोनि पाॅल थेंगल ( वय ६५ ) ४) कालीचरण माजीलाल कनोजिया (वय ५४) ५) शान अली झाकीर अली सिद्दीकी (वय ३१) अशी या गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या घटने बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सिंलेडरचा स्फोट झाला.नंतर पहिल्या मजल्यावर 🔥 भीषण आग लागली.त्यामुळे सकाळी सकाळी सर्वांची एकच धावपळ उडाली.नंतर अग्निशमन दलाला कळविण्यात आले.त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग पावने सातच्या सुमारास आटोक्यात आणली आहे.व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.