ख्रिश्चनांच्या सभेवेळी स्फोट एन.आय ए.ची टीम घटनास्थळी दाखल : केरळमधील कन्व्हेन्शन सेंटर मध्ये एका पाठोपाठ पाच साखळी स्फोट झाले असून १ ठार २३ जखमी

पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) केरळमधील कोचीतील कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी लागोपाठ पाच साखळी स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली असून.या स्फोटात १चा मृत्यू झाला आहे तर अन्य २३ जण हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.यात ५ जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे. यात मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान या स्फोटाबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोचीमधील कलामासेरी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज सकाळी ख्रिश्चन समाजांची सभा सुरू होती सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक पणे एकापाठोपाठ पाच साखळी स्फोट झाले आहेत.या स्फोटात १ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे तर अन्य २३ जण हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळील रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.यात एकूण ५ जणांची प्रकृती ही चिंताजनक असून यात मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.सभेला एकूण २ हजारांवर ख्रिश्चन समाजांचे लोक उपस्थित होते.दरम्यान या साखळी स्फोटांची चौकशी ही एन.आय .ए.द्वारे चौकशी केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी माध्यमांना दिली आहे.केंदीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्याशी चर्चा करून स्फोट बाबत माहिती घेतली आहे.घटनास्थळी एन.आय.ए.ची टीम रवाना झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.