उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील सकाळी १० वाजता घेणार पत्रकार परिषद : गावकरी व माता भगिनींच्या आग्रहानंतर उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लावलं मध्यरात्री सलाईन,आज घेणार मोठा निर्णय

पुणे दिनांक १२ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांनी सलाईन लावावे म्हणून मध्ये रात्री उशिरापर्यंत प्रचंड आग्रह गावकरी व माता भगिनी यांनी केल्या नंतर त्यांनी रात्री सलाईन लावले आहे.ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत.डाॅक्टरांच्या पथकाने रात्री साडे बारा वाजता तपासणी करून त्यांना सलाईन लावले आहे.
दरम्यान आज आज सकाळी १० वाजता मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत.व दुपारी दोन वाजता ते मराठा समाजाच्या बांधवा बरोबर चर्चा करुन पुढील भूमिका घेणार आहेत.आता माझ्यात निर्णय क्षमता राहिली नाही.सरकारला वेळ का पाहिजे.सरकार ने . योग्य कारण दिले तर दोन काय चार पावलं मागे येण्या साठी तयार आहे.असे जरांगे पाटील यांनी यावेळी म्हणाले आहे.सरकार खरंच आरक्षण देणार का.याबाबत सरकारने उत्तर दिले पाहिजे.दरम्यान काल सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे.असा ठराव झाला आहे.
दरम्यान या बैठकीत आंदोलंकावरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.तसेच मराठा समाजाच्या आरक्षण साठी अॅड शिंदे यांची समिती नेमली नेमली असून त्या मध्ये जरांगे पाटील यांचे प्रतिनिधींनी यावं असं आवाहन त्यांनी केले आहे.परंतू समिती मध्ये जरांगे पाटील व त्यांच्या प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. उपोषण संदर्भात आज दुपारी दोन वाजता निर्णय घेणार आहेत.यावेळी जरांगे पाटील म्हणाले की सरकार आंदोलंकावरील सर्व गुन्हे मागे घेत असेलतर त्यांचे स्वागत करतो आमचं गाव कौतुक करत असल्याचे ते म्हणाले मी कुणाला भीत नाही मी माझ्या समाजाला भितो असे देखील ते म्हणाले.मागील १५ दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे.त्यांची प्रकृती खालावली आहे.त्यांनी पाणी व सलाईन लावून घेण्यास नकार दिला होता.परंतू गावकरी व माता भगिनी यांच्या प्रचंड आग्रहा नंतर त्यांनी रात्री साडे बारा वाजता डॉक्टर कडून तपासणी करून सलाईन लावून घेतले .व उपचार घेतले.दरम्यान महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागण्यासाठी जरांगे पाटील हे ठाम आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.