Criminals arrested : जबरी चोरी करणा-या गुन्हेगारांस केले गजाआड

सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे त्यांचे स्टाफसह शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध घालण्याचे अनुषंगाने तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 162/2022 भा द वि कलम 392, 34 मधील जबरी चोरी करणा-या इसमांचे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे प्राप्त फोटोंच्या आधारे पेट्रोलिंग करीत असताना पोलिस हवालदार बशीर सय्यद यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील जबरी चोरी करणारा इसम हा सध्या पाटील इस्टेट, इराणी वस्ती शिवाजीनगर पुणे येथे त्यांच्या सासुकडे काही दिवसांपुर्वीच राहावयास आला असुन सध्या तो पाटील इस्टेट मध्येच त्याचे सासुचे राहते घराबाहेर उभा असलेबाबत माहीती मिळाली.
सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना कळविली असता, त्यांनी सदर ठिकाणी जावून खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्यानंतर तपास पथकातील अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे स्टाफसह पाटीलइस्टेट, इराणी वस्ती,शिवाजीनगर पुणे येथे रवाना होवुन तेथे सापळा रचुन सदरठिकाणी वरील वर्णनाचा मुलगा उभा असलेला दिसला त्यास ताब्यात घेवून, विश्वासात घेवून माहीती घेतली असता त्याने त्याचे नाव इरफान बाबलु शिया वय 22 वर्ष, सध्या राहणार पाटील इस्टेट, इराणी वस्ती, शिवाजीनगर पुणे मुळ गाव राहणार गंगानगर, इराणी मश्जिदच्या समोर, ता. गुंटकल, जि अनंतपुर राज्य आंध्रप्रदेश असे असल्याचे संागितले.त्यास वि·ाासात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केलेचे कबुल केले आहे.
सदर आरोपीकडुन दाखल गुन्हयातील फिर्यादीचा जबरीने चोरुन नेलेला मोबाईल फोन आणि गुन्हयात वापरलेली मोटार सायकलअसा एकुण 42,000/- किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेवुन शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा रजि. नं. 162/2022 भा द वि कलम 392, 34 हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी श्री.राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, डॉ.प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त परि-01, पुणे शहर, श्री.रमाकांत माने, सहा.पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग,पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली ,पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.विक्रम गौड, सहा.पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अंमलदार गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, रुपेश वाघमारे, अविनाश भिवरे, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के यांनी केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.