Criminal arrested : वयोवृध्द महिलेचे जबरीने मंगळसूत्र चोरी करणारा चोरटा जेरबंद

20 ऑक्टोबर 2022 रोजी नॅन्सी लेक होम सोसायटी मेनगेट समोर, कात्रज पुणे येथून वयस्कर महिला या पायी जात असतांना अनोळखी चोरटयाने त्यांच्या गळयातील 02,00,000/- रु किमंतीचे 4 तोळे वजनाची सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारुन ओढून चोरुन नेलेवरुन भारती विद्यापीठ पो स्टे गुरंन 700/22 भादवि कलम 392 प्रमाणें गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासकामी मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो श्री श्रीहरी बहिरट यांनी गुन्हे शोध व तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेकामी सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, आशिष गायकवाड व अभिनय चौधरी यांनी घटनास्थळ व आजू बाजूच्या परिसरातील सि.सी.टि.व्ही फुटेजची बारकाईने पहाणी करुन फोटो मिळवून त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे शोध घेवून यांतील आरोपी नामे विशाल कामराज कांबळे,वय 30 वर्षे,रा.पदमावती यास अटक करुन सदर गुन्हयातील गेला माल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी मा सागर पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, मा. श्रीमती सुषमा चव्हाण साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे, श्री.श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय पुराणीक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील सहा.पोलीस निरीक्षक अमोल रसाळ,पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, व पोलीस अंमलदार, नरेंद्र महांगरे,शैलेंद्र साठे, रविंद्र चिप्पा, मितेश चोरमले,आशिष गायकवाड, अभिनय चौधरी,राहूल तांबे,, धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, सचिन गाडे, अवधुत जमदाडे, विक्रम संावत, वि·ानाथ घोणे,सचिन सरपाले,मंगेश पवार,निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.