भ्रष्टाचार प्रकरणी CIDची मोठी कारवाई : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पहाटेच अटक

पुणे दिनांक ९ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज भल्या पहाटे अटक करण्यात आली आहे.स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये घोटाळा केल्याचा चंद्राबाबू नायडू यांच्या वर आरोप आहे.आंध्रा प्रदेशमधील नंदयाला मधून सीआयडी कडून अटक करण्यात आली आहे.त्यांच्या मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.या बाबत टीडीपी ने माहिती दिली आहे.भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने CID ने नायडू यांना आज ९ सप्टेंबर रोजी पहाटे कारवाई केली आहे.त्यांच्या वर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नांदयाला शहरातील आरके फंक्शन हाॅलमध्ये असलेल्या कॅम्प विश्रांती घेत असताना नायडू यांना पहाटे तीन वाजता अटक करण्यात आली आहे.
दरम्यान त्यांना अटक करण्यासाठी डीआयजी रघुरामी रेड्डी व नांदयाल रेंजच्या सीआयडी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा नांदयाल येथील आरके फंक्शन हाॅल परिसरात दाखल झाला होता. टीडीपी कार्यकर्ते यांचा पोलिसांशी वाद झाला यावेळी चंद्राबाबू नायडू यांचे टीडीपी कार्यकर्ते नेते व आंध्र प्रदेश सीआयडी पोलिसांन मध्ये जोरदार वादावादी झाली आहे.त्यानंतर पहाटे सहा वाजता नायडू हे व्हावं मधून खाली उतरले आणि पोलिसांन बरोबर चर्चा केली . त्यांच्या अटकेसाठी ५१ सी आर पी सी अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती.याप्रकरणी नायडू यांनी पोलिसांना तपशील मागितला मात्र पोलिसांनी तपशील न्यायालयात सादर केला आहे.असे त्यांना सांगितले व तपशील देण्यास नकार दिला.नायडू यांची चौकशी करून या प्रकरणी संपूर्ण माहिती व रिमांड अहवाल देण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे मान्य केले.व अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.