Crime : राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा व मुलगा यांना कोळसा खाण घोटाळा प्रकरणात ४ वर्षांची दिल्ली विषेश न्यायालयाने सुनावली शिक्षा

पुणे दिनांक २६ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा व त्यांचा मुलगा देंवेद्र दर्डा या पितापुत्रांना कोळसा खाण घोटाळा प्रकरणात ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जे.एल.डी.यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांच प्रकरणातील यांना देखील ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे या तिघांना ४ वर्षांचा तुरंगवासांचा यात समावेश आहे. या प्रकरणांतील निवृत्त कोळसा सचिव एच.सी.गुप्ता दोन जेष्ठ अधिकारी के.एस.क्रोफा .व के.सी.समरिया .या तिघांना तीन वर्षांची शिक्षा व तुरुंगवास अशी शिक्षा याच प्रकरणात सुनवली आहे .
दरम्यान या एकूण ६ जणांना शिक्षा सुनावली आहे. हे कोळसाखाण प्रकरण सन २००७ चे आहे.तब्बल १६ वर्षांनी हा निकाल लागला आहे.सन १९९९ ते २००५ या कालावधीत जेएलडी.यवतमाळ यांना हे जुने ब्लाॅक देण्यात आले होते. त्याची माहिती लपवून पुन्हा युपीए सरकारच्या काळात गैरमार्गाने कंत्राट मिळविल्याचा आरोप होता. युपीए सरकारच्या काळात गाजलेल्या घोटाळा म्हणून याला कोळसा घोटाळा असे नाव देण्यात आले होते.
दरम्यान या प्रकरणात ही १३ वी शिक्षा आहे.या संदर्भात मनमोहन सिंह यांना लिहिलेले पत्रात माहिती लपवण्याचा आरोप करण्यात आला होता. याच आधारावर ही शिक्षा सुनवण्यात आली आहे.
छत्तीसगड कोळसा घोटाळ्यातील अनेक आरोपी तुरुंगात छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांच्या व्यक्तीचा समावेश आहे. या प्रकरणांत अनेक मोठे अधिकारी आणि राजकरण्याशी संबंध असलेले अनेक जण रायपूर मधील तुरुंगात कैद आहेत .या मध्ये आयएएस अधिकारी समीर बिश्र्नोई .सैम्य चौरसिया .मुख्यमंत्री यांचे उपसचिव सूर्यकांत तिवारी कोळसा घोटाळा मधील चाणक्य म्हणून काम करणारे सुनिल अग्रवाल यांचा यात समावेश आहे. गेल्या ९ वर्षांत अनेक वेदना भोगल्या आहेत. त्यामुळे आमची शिक्षा कमी करण्यात यावी. असा युक्तिवाद दर्डाच्या वतीने या वेळी न्यायालयात केला .विजय दर्डा हे काँग्रेस कडून राज्यसभेवर खासदार होते.गेल्या ५ दशकांपसून दर्डा कुंटूब राज्याच्या व देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे आजच्या निकालांने ..दर्डा कुंटूबीया समोरची आव्हानं नक्कीच या प्रकरणा मुळे वाढलेली आहेत.हे मात्र नक्की.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.