मराठा आरक्षणासाठी रोज तीन मराठा समाजाच्या आत्महत्या.सरकारला जाग कधी येणार : मराठा आरक्षणासाठी लातूर येथील माजी सरपंचाने आळंदी इंद्रायणी नदीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा

पुणे दिनांक २८ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजास आरक्षण मिळावे, यामागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे.व दुसरीकडे या मागणीसाठी आत्महत्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसत आहे.रोज सर्व साधारण ३ ते ४ आत्महत्या होत आहे.पण राज्य सरकारला जाग येत नाही.लातूर जिल्ह्यातील माजी सरपंच व्यंकट नरसिंग ढोपरे वय ६५ यांनी ' मराठा समाजाला त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून आळंदीतील इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह इंद्रायणी नदीपात्रात आढळून आला आहे.
दरम्यान ढोपरे हे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा या गावाचे माजी सरपंच होते.पुण्यातील न-हे आंबेगाव येथे राहणाऱ्या मुलगा संदीप ढोपरे यांच्याकडे आले होते.काल ते आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी जाऊन येतो असे सांगून ११ वाजता घरातून गेले.दरम्यान त्यांचे कपडे धुताना घरच्यांना चिठ्ठी सापडली त्यामुळे घरच्या लोकांनी रात्रीच्या वेळेस आळंदी येथील इंद्रायणी नदी घाट परिसरात शोध घेतला असता त्यांची पिशवी सापडली यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीपात्रात शोध घेतला.आज दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.