बुडालेल्या गणेश भक्तांची बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरू : नाशिकमध्ये गणेश विसर्जन दरम्यान चार जण बुडाले

पुणे दिनांक २८ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज अनंत चतुर्दशी दिवशी सर्वत्र लाडक्या गणेश बाप्पाचे विसर्जन होत असताना.नाशिक जिल्ह्यात एक घटना घडली असून यात चौघेजण बुडाले असल्याची माहिती मिळत आहे.या दुर्घटनेत गोदावरी नदी मध्ये दोघे जण तर वालदेवी धरणात दोघेजण बुडाले आहेत.यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली आहे.त्यामुळे नाशिक येथे गणेश विसर्जन मिरवणूकीला गालबोट लागले आहे.
दरम्यान या दुर्घटना बाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या गाडगे महाराज पुलाजवळील विसर्जन घाटावर गणपती बाप्पाचे विसर्जन करताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेजण बुडाले आहेत.बुडालेल्या दोघा जणांचं शोध नाशिक महापालिकाचे अग्निशमन दलाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने बोटीच्या सहाय्याने घेत आहेत.तर वालदेवी धरणात बुडालेल्या दोंघाजणांचे मृतदेह सहा वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आले आहेत. या परिसरात गणपती बाप्पाचे विसर्जना बाबत बंदी असतानाही या ठिकाणी विसर्जन केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे सूत्रांनद्वारे माहिती मिळाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.