रायगड पोलिसांनी आवळल्या चौंघाच्या मुसक्या : मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देतो असे सांगून युवकांची फसवणूक ३२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे येथील अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे.तर अशीच दुसरी फसवणूक प्रकरणी घटना ही अलिबाग येथील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देतो असे सांगून अनेक गरजू विद्यार्थ्यांनची फसवणूक प्रकरणी रायगड पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग येथील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो असे सांगून कोल्हापूर येथील अभिजीत वानिरे यांच्या कडून या टोळीने ३२ लाख ५० हजार रुपये घेतले होते.यात रायगड मधील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या टोळीतील चौंघाच्या मुसक्या आवळल्या आहेत.व यात अटक करण्यात आलेल्याची नावे १) सौरभ दास, २) सोमेन मन्न , ३) सोमेश बारा ४) अभिषेक कुमार रज्जाक याप्रमाणे आहेत पोलिसांनी आरोपी कडून २० लाख रुपयांची रोकड व मोबाईल व एक गाडी असा एकूण २५ लाख रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.यातील अन्य तींघेजण साथीदार फरार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.