Instagram Story gives rise to fight : इन्स्टाग्रामवर स्टोरी वरून काॅलेज मध्ये दोन गटात दे दणादण...

उरुळी कांचन येथील पद्मश्री मनीभाई देसाई जुनियर कॉलेजमध्ये 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याच्या वादातून विद्यार्थ्यांनी लोखंडी स्टिक, लाकडी दांडके अशा हत्यारांनी एकमेकांना बेदम मारले. दोन्ही गटांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना 24 जानेवारीला पद्यश्री मनिभाई देसाई ज्युनिअर कॉलेजच्या पार्किंग परिसर व ओढयाजवळ बाजाररोड, उरळीकांचन, पुणे येथे घडलेली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी १) आदेश दत्तात्रे कांचन (वय अंदाजे १७ पांढरास्थळ वस्ती उरुळी कांचन) २) प्रेम संतोष कांचन (वय १८ रा. उरुळी कांचन) ३) कुणाल राजेंद्र कांचन रा उरुळी कांचन) याना ताब्यात घेतलं आहे.लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात 17 वर्षीय मुलाने आठ जणां विरोधात तक्रार दाखल केली आहे.
दोन्ही गटातील फिर्यादी तरुणांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकमेकांना खिजवणारे स्टेटस ठेवलेले होते. या स्टेटस संदर्भात एकमेकांना आक्षेप होते. या स्टेटस बाबत कॉलेजच्या पार्किंगमध्ये एकमेकांना जाब विचारला असता त्यांच्यात वादावादी झाली. या वादाचे परिवर्तन नंतर मारहाणीमध्ये झाले. दोन्ही गटातील एकूण ११ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.