Gaja marne arrested : कुख्यात गुंड गजा मारण्याच्या पुणे पोलिसांनी वाई इथून आवळल्या मुस्क्या

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे ला पुणे पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील वाई तालुका येथून एका फार्म हाऊस वरून ताब्यात घेतले असून इस्टेट व शेअर ब्रोकरचे आपण व खंडणीप्रकरणी गजानन मारणे याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याला घेऊन खंडणी विरोधी पथक पुण्याकडे निघाले आहेत.
दरम्यान हा आज ऍड. विजय सिंह ठोंबरे यांच्या फार्म हाऊस वर त्यांना भेटण्याकरिता गेला असता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शेयर एंजट हा व्यवसाय करणाऱ्या कडे वीस कोटी रुपयांची खंडणी मागून त्याचे अपहरण करून त्याला जीवे ठार मारण्या प्रकरणाची धमकी दिल्याप्रकरणी गजा उर्फ गजानन मारणे च्या विरोधात त्याच्यासह एकूण 14 जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे याप्रकरणी अजून एक डॉक्टर प्रकाश साताप्पा बंदी वडेकर याला कालच महाराष्ट्र प्रदेश इंदूर इथून पोलिसांनी अटक केली होती. व त्यानंतर आज गजा मारलेला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी या आधीच गजावर गजानन पंढरीनाथ मारणे. ( रा. शास्त्रीनगर कोथरूड.) हेमंत उर्फ आप्पा बालाजी पाटील. ( वय.३९. रा. बोरवली पलूस सांगली.) अमर शिवाजी कीर्दत.( वय.४६.) फिरोज मोहम्मद शेख .( वय.५०. दोघे.रा. कोडोवली. जिल्हा सातारा.) रुपेश कृष्णराव मारणे. ( रा. शास्त्री नगर कोथरूड) संतोष शेलार. ( रा.कोथरुड.) मोनिका अशोक पवार. ( दापोडी पुणे) अजय गोळे.( रा.न्हरे.पुणे.) नितीन पगारे. ( रा.सातारा.) प्रसाद खंडागळे. ( रा. तळजाई पठार पद्मावती.) व नऊ गणे यांच्यासह आणणे साथीदारांवर देखील मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे भारती विद्यापीठ भागात राहणाऱ्या शेयर एंजट चे अपहरण करून त्यांना खंडणी मागितल्याच्या आरोपावरून खंडणी विरोधी पक्षाने यातील सर्वांना यापूर्वीच अटक केली आहे. गजा मारणे हा फरार होता त्याच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी पोलीस पदके रवाना केली होती. त्याचा शोध घेत असताना सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एका फार्म हाऊस वर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून खंडणी विरोधी पथकाचे पोलीस त्याला घेऊन पुण्यात येत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.