३९४ पोलिसांना पदोन्नती पोलिस आयुक्तांनी काढले आदेश : गणपती बाप्पा पिंपरी चिंचवड मधील ३९४ पोलिसांना पावले

पिंपरी चिंचवड २० सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑन लाईन न्यूज टीम) पिंपरी चिंचवड येथील पोलिस आयुक्तालयातील तब्बल ३९४ पोलिसांना गणपती बाप्पा पावले आहेत.गणपती बाप्पाच्या पदस्पर्शाने पोलिस नायक पदावरून हवालदार पदी तर अन्य चौंघा जणांना पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.तसे आदेश पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी काढले आहेत.
दरम्यान औद्योगिकीकरण व मोठ्या प्रमाणावर झालेली हद्दवाढ यामुळे पिंपरी चिंचवड येथे स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली होती.याला आता पाच वर्षे झाली आहेत.मागील महिन्यात दोन पैोलिस उपआयुक्त राज्य सरकारच्या वतीने या पोलिस आयुक्तलयाला देण्यात आले होते.पोलिस कर्मचारी यांची प्रचंड आवश्यकता या पोलिस आयुक्तालयाला आहे.या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सेवाज्येष्ठता नुसार एकूण ३९० जणांना नाईक पदावरून हवालदार पदावर तर अन्य चौंघा जणांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली आहे.या पदोन्नती नंतर या सर्व पोलिस कर्मचारी यांच्यात व कुंटूंबात आनंदाचे वातावरण आहे.एकंदरीत गणपती बाप्पाच्या पदस्पर्शाने या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.