नांदेड - वसमत येथे अज्ञातांनी एसटी बस पेटवली : मराठा आंदोलंक आक्रमक नेत्यांना गावबंदी.नांदेड वसमत येथे रात्री एसटी पेटवली

पुणे दिनांक १३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा आरक्षण प्रकरणी मराठा समाजाचे तरुण कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत.नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील गावात नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे.तर काल रात्री काही अज्ञात व्यक्तीनी नांदेड ते वसमत रोडवर एसटी बसवर हल्ला केला.आधी दगडफेक करून बस थांबवली व त्या नंतर या बसमधील ४७ प्रवाशांना खाली उतरंऊन व नंतर बस वर पेट्रोल टाकून टाकून बस पेटवली व नंतर २० ते २५ अज्ञात व्यक्ती पळून गेले आहेत.मात्र अचानक पणे झालेल्या या हल्ल्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान नांदेड जिल्ह्यात काल रात्री नांदेड ते वसमत या रोडवरून एसटी बस क्रमांक एम एच २० बी.एल. ११४६ ही जात असताना २० ते २५ अज्ञात व्यक्तीने प्रथम बसवर दगडफेक करून बस थांबवली व नंतर एसटी बस मधील सर्व ४७ प्रवाशांना प्रथम खाली उतरवून बसवर पेट्रोल टाकून बस पेटवली व अज्ञात हल्लेखोर नंतर पळून गेले आहेत.व यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या आहेत.दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत त्यांनी मेंढला व उमरी या दोन गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. ' चुलीत गेले पक्ष व नेते ' फक्त मराठा आरक्षण हेच आमचं लक्ष ...व मराठा आरक्षण मिळे पर्यंत सर्वच राजकीय पक्ष व व कुठल्याही नेत्यांना गावात प्रवेश नाही असा मजकूर असलेला फलक लावण्यात आला आहे.त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने आरक्षणांचा मुद्दा गाजला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.