समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच : गौरी- गणपती करीता पुण्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या कुंटूंबाच्या कारला अपघात एक ठार तीन जखमी

पुणे दिनांक २० सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.पुण्यावरुन अमरावतीला गावी गणपती व गौरी साठी जाणाऱ्या कुंटूंबाच्या कारला वन्यप्राण्यांची धडक झाल्याने झालेल्या अपघातात एक महिलांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य तिघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान अपघात प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार मधील कुंटूब कार मधून मंगळवारी सायंकाळी पुण्यावरून अमरावतीकडे गणपती व गौरी साठी जात असताना समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील वनोजा कारंजा येथे महामार्गावरुन जाणाऱ्या वन्यजीवप्राण्यांने कारला जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात एक महिला ठार झाली तर अन्य तिघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांना तातडीने उपचारा करिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान राज्य सरकारच्या वतीने या महामार्गावरुन उपाययोजना करुन देखील अपघाताची मालिका सुरूच आहे.आता हा समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असलेल्या एकंदरीत सतत होणाऱ्या अपघाता वरुन दिवस आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.