देशभरात तीन ठिकाणी संयुक्तरीत्या महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई : हावडा रेल्वे ट्रेनमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ११ जणांच्या आवळल्या मुसक्या १९ कोटीचे सोने जप्त

पुणे दिनांक १५ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महसूल गुप्तचर संचालनालयाने रेल्वे ट्रेन मधून सोन्याची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.देशभरात तीन ठिकाणी संयुक्तरीत्या कारवाई करत १९ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे.दरम्यान सदरची कारवाई ही वाराणसी, नागपूर व मुंबई अशी कारवाई करण्यात आली आहे.महसूल गुप्तचर संचालनालयाने नागपूर रेल्वे जंक्शन येथून ८ किलो ५०० ग्रॅम गोल्ड बिस्कीट सह दोघांजणांना अटक केली आहे.तसेच असे तीन ठिकाणी संयुक्तरीत्या कारवाई करत तब्बल १९ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे.अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या वतीने ट्विट करत देण्यात आली आहे.
दरम्यान रोड व रेल्वे ट्रेन मधून विदेशी सोन्याची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तचर संचालनालया मिळाली होती.याच माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवून तीन ठिकाणी संयुक्तरीत्या धाडी टाकण्यात आल्या.या प्ररकणी सोन्याची तस्करी करणाऱ्या मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात मोठे यश आले आहे.यात नागपूर, वाराणसी व मुंबई नियोजित व सुव्यवस्थीत मोहीम राबविण्यात आली.यात सुमारे ३१.७ किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे.असून या सोन्याची बाजार पेठेत १९ कोटी रुपयांची किंमत आहे.यात एकूण ११ सोने तस्कर यांना अटक करण्यात आले आहे.सदरची कारवाई ही दिनांक १३ व १४ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आली आहे.दरम्यान नागपूर -पुणे हावडा दरम्यान धावणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेस हावडा या रेल्वे ट्रेन मधून दोन आरोपी सोने घेऊन येत असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तचर संचालनालया मिळाली होती.यातील दोन्ही आरोपींना नागपूर रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आले व त्यांच्या कडून ८.५ किलो इतक्या वजनाचे सोने आढळून आले.या दोघांजणांना रेल्वे सुरक्षा पथकाच्या मदतीने अटक करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.