Seized : कोंढवा येथे छापा टाकुन 8,71,960/- रुपये किंमतीचा प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे परिमंडळ-5 मधील कोंढवा पोलीस ठाणेच्या परीसरात दि.14/10/2022 रोजी पेट्रोलींग करीत असताना,पोलीस अंमलदार यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,येवलेवाडी ते खडी मशिन चौक दरम्यान इसम नामे सिराज नुरआलम मनसुरी हा सिल्व्हर रंगाचा टेम्पो क्रमांक एम.एच.12/टी/व्ही./7616 यामधुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा याची पोती विक्री करीता घेऊन जाणार आहे.
त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथक-2,कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमुद परीसरात सापळा लावला असता,दांडेकरनगर सिंहगड कॉलेज जवळ येवलेवाडी कोंढवा,पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे सिराज नुरआलम मनसुरी,वय-29 वर्षे,रा.स.न.42,नुर मश्जिद जवळ कोंढवा,पुणे हा सिल्व्हर रंगाचा टेम्पो क्र.एम.एच.12/टी/व्ही.7616 घेऊन येत असताना,त्यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातील टेम्पोची झडती घेतली असता,टेम्पो मध्ये 4,23,360/- रू किचा तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा 2)5,00,000/- रू किचा टेम्पो एम.एच.12/टी/व्ही.7616 जप्त करुन त्याचेकडे तपासा दरम्यान चौकशी करुन त्याने बोपगाव,ता.पुरंदर येथे असलेले गोडाऊन मध्ये अणखीन माल ठेवला असलेबाबत सांगीतल्याने,सदर गोडाऊन येथे छापा कारवाई करुन 4,48,600/- रुपये किंचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखुजन्य पदार्थ,पान मसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडुन एकुण 13,81,960/- रुपय किचा ऐवज त्यामध्ये एकुण 8,71,960/- रुपये किंचा तंबाखु जन्य पान मसाला व गुटखा व 5,00,000/- रू किच्या टेम्पो एम.एच.12/टी/व्ही.7616 जप्त करुन, त्याचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेंशन गु.र.नं.1031/2022,भादविकलम 328,188,272,273,सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार,वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय),अधिनियम कलम 7 (2) व 20(2) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम 2006,चे कलम 26(2) (त्)(त्ध्) चे उल्लंघन केल्याने कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करून,सदरचा तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा जप्त केला आहे.
दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक,दिगंबर चव्हाण हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, मा.सह पोलीस आयुक्त,श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त,गुन्हे,श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहा पोलीस आयुक्त,गुन्हे-2,श्री.नारायण शिरगावकर, यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-2,गुन्हे शाखा,पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक,सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक,दिगंबर चव्हाण, पोलीस उप-निरीक्षक,एस.डी.नरके, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, शेख, शेळके, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, शेख, युवराज कांबळे,दिनेश बास्टेवाड व महिला पोलीस अंमलदार, दिशा खेवलकर यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.