Gutkha seized : पंढरपुरात ४० लाख रुपयांचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

महाराष्ट्र शेजारील कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटका येत असून असाच एक ट्रक भर गुटका कर्नाटक राज्यातून पुणे सोलापूर महा मार्गावरील टेंभुर्णी येथे आला असता अहिल्यादेवी तुला जवळ सदरचा ट्रक पकडला असल्याची माहिती गुन्हे प्रगटीकरण शाखेने दिली आहे. सदरच्या ट्रक मध्ये अंदाजे 30 ते 40 लाख रुपयांचा गुटखा असल्याचे कळत आहे.
सदरच्या घटनेबाबत पंढरपूर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ट्रक क्रमांक एम एच ०९ सी ओ ३६३० या ट्रक द्वारे कर्नाटक मधून गुटखा सांगोले मार्गे पंढरपुरात येणार असल्याची खबर मिळाली होती
याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सी व्ही केंद्रे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम व पोलीस निरीक्षक अरुण कदम यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली. सदर ट्रक हा टेंभुर्णी येथे आढळून त्या ट्रकची तपासणी केली असता. सदरचा ट्रक मध्ये गुटख्याची पोती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालक प्रकाश रेवाप्पा शेजाळे. ( वय.२१. रा.सोलापूर ) याला अटक करून तपास केला असता. तपासामध्ये त्यांनी सांगितले की ट्रक मध्ये गुटखा असून सदरचा गुटखा हा कर्नाटक येथून आणल्याचे सांगितले आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार या ट्रकमध्ये एकूण 30 ते 40 लाख रुपयांचा गुटखा असू शकतो. असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सी व्ही केंद्रे यांनी केली असून याप्रकरणी पुढील तपास ते करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.