सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांवर ताशेरे ओढल्या नंतर सुनावणी : शिवसेन आमदार अपात्रता बाबत आज दुपारी तीन वाजता सुनावणी

पुणे दिनांक २५ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवसेना दोन गटात सत्तासंघर्ष प्रकरणी शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या नंतर सुप्रीम कोर्टाने अध्यक्षां वर चांगलेच ताशेरे ओढल्या नंतर व अध्यक्ष यांचा या प्रकरणी वेळकाढूपणा बाबत त्रीव नाराजी व्यक्त केली होती.आजपासून महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज दुपारी होणार आहे. एकंदरीत या सुनावणीला वेग आला आहे.
दरम्यान शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसेनाच्या ठाकरे गटाने तत्काळ ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्या सह त्यांच्या गटामधील १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी उपाध्यक्ष यांच्या कडे अर्ज केला होता.व नंतर या प्रकरणी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या अन्य ४० आमदार यांना देखील अपात्र ठरविण्याकरीता अर्ज दाखल करण्यात आला होता.एकनाथ शिंदे गटाच्या वतीने आदित्य ठाकरे यांना वगळून १४ आमदार यांना अपात्र ठरविण्याकरीता अध्यक्ष यांच्या कडे अर्ज दाखल केला होता.अशा प्रकारे एकूण ५४ आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्ष यांच्या कडे निर्णय प्रलंबित आहे.या प्रकरणी मागील चार महिन्यांन पासून विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत असा आक्षेप ठाकरे गटाच्या आहे.व या संदर्भात ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अध्यक्षांच्या या वेळकाढूपणावर ताशेरे ओढले आहेत
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.