धनगर समाजाच्या आंदोलंकाचे बंगल्याबाहेर रास्ता रोको : अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीच्या बंगल्यासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणे दिनांक १९ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण सुरू असून आंदोलक चांगले आक्रमक झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर आंदोलंक यांनी रस्ता रोको केला आहे.व रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे.
दरम्यान बारामती येथील बारामती ते भिगवण रोडवरच सहयोग सोसायटी येथे उपुख्यमंत्री अजित पवार यांचा बंगला असून आज बंगल्यासमोर धनगर समाजाच्या तरुणांनी आज धनगर समाजाच्या आरक्षणासाठीरास्ता रोको आंदोलन केले असून बंगल्याबाहेर रोडवरच आंदोलंकानी ठिय्या मांडला आहे.धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.व याकरिता धनगर समाजाचे चंद्रकांत वाघमोडे हे उपोषणाला बसले आहेत.आज त्यांचा उपोषणाचा ११ वा दिवस आहे.या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था साठी पोलिसांचा ताफा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.दरम्यान आंदोलन कर्ते यांनी रस्तारोको करुन घोषणा बाजी सुरू केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.